Aditya L1 Mission : 'आदित्य एल-1'चं काउंटडाऊन सुरू; प्रक्षेपणापूर्वी इस्रोच्या वैज्ञानिकांनी घेतलं श्री वेंकटेश्वर मंदिरात दर्शन

Aditya L1 Mission : इस्त्रोने भारताची चांद्रयान-३ ही अत्यंत महत्वकांक्षी मोहिमी यशस्वी ठरल्यानंतर आता सर्व जगाचे लक्ष भारताच्या सुर्य मोहिमेकडे लागले आहे. सुर्याशी संबंधीत माहिती गोळा करम्यासाठी भारताकडून पहिले सौर मिशन आदित्य-एल1 उद्या लाँच करण्यात येणार आहे. या लाँचपूर्वी इस्त्रोमधील शास्त्रज्ञांच्या एका टीमने आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

एएनआय या वृत्तसंस्थेने शास्त्रज्ञांचा व्हिडीओ शेअर केला आहे. इस्त्रो शास्त्रज्ञांची एक टीमvs तिरुमला श्री वेंकटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. महत्वाचे म्हणजे वैज्ञानिकांनी आदित्य-L1 मिशनची लहनशी प्रतिकृती सोबत घेऊन मंदिरात जात या मोहमेच्या यशासाठी प्रार्थना केली.

Mallikarjun Kharge On PM Narendra Modi: 'खोटं बोला पण रेटून बोला...'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

भारताची पहिली सौर मोहीम (आदित्य-L1 मिशन) 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून प्रक्षेपित होणार आहे. इस्त्रोच्या PSLV XL या रॉकेटच्या माध्यमातून आदित्य-L1 मिशन सूर्याच्या दिशेनं झेपावणार आहे.

भारत पहिल्यांदाच अंतराळात सूर्य निरीक्षण मोहिम लॉन्च करणार आहे. भारताच्या या आदित्य L1 मिशनचा प्रमुख हेतू हा अंतराळातून सूर्यावरील घडामोडींचं निरीक्षण करणं हा आहे. सूर्याचा अभ्यास करताना त्याची अनुकूल कार्यक्षमता कशी आहे? तसेच सूर्याचं वर्तन आणि त्याच्या वर्तनाचे परिणाम याचा अभ्यास केला जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply