Ravindra Mahajani : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन, घरात आढळला मृतदेह; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

Actor Ravindra Mahajani Passed Away : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह आढळल्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

कुठे घडली घटना?

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे. ते गेले ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

"आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली." असं ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला, त्यानंतर त्यांचं बालपण हे मुंबईत गेलं. त्यानंतर पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तसेच त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी ( १९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply