Accident News : रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात; 17 पोलिस जखमी

कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या सर्वेक्षणाची आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. बारसू, सोलगावसह आसपासच्या परिसरात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासाठी जवळपास दीड ते दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 17 पोलिस जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कशेडी गावाजवळ पोलीस गाडीला अपघात झाला आहे.

बारसू, सोलगावसह आसपासच्या परिसरात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रिफायनरी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली आहे. गावागावातील काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहेत.

तर दुसरीकडे कोकणातील रिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. बारसू आणि सोलगावच्या परिसरात आज पोलिसांचा रूट मार्च काढण्यात येणार आहे. गावागावातील ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply