Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; आई-वडिलांनी लेकरांसमोर सोडले प्राण

Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातांचं सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संख्याही वाढताना दिसत आहेत. अशातच आज समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन करून शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या भाविकांची स्विफ्ट कार आणि ट्रकच्या धडकेत तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा भीषण अपघात काल (बुधवार 8 मार्च) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगावजवळील पथकर नाक्याच्याजवळ झाला. यामध्ये अनिल किसन राठोड (वय 35 वर्षे), भाग्यश्री अनिल राठोड (वय 32 वर्षे), रोहन सुनील राठोड (12 वर्षे, सर्व रा. पळशी तांडा नंबर 2, ता. जि. औरंगाबाद) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेली स्विफ्ट कार (एमएच 14 एफसी 5387)मालवाहू ट्रक (एमएच 18 बीजी 7702) ला पाठीमागून जोरात धडकली. या भीषण अपघातात चालक अनिल राठोड, त्यांची पत्नी भाग्यश्री राठोड आणि रोहित राठोड या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर आदित्य अनिल राठोड (वय 12 वर्षे), लावण्या अनिल राठोड (वय 10 वर्षे) हे जखमी झालेत. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply