Accident News : बर्थडे पार्टीनंतर घडलं अघटित, कार अपघातात दाेघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Accident News : भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या कार अपघातात  दाेघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने भंडारा कोरंभी मार्गावर  हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली.

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपघातग्रस्त रात्रीच्या दरम्यान वाढदिवसाची पार्टी करून गावाकडे परत येत हाेते. यावेळी भंडारा काेरंबी मार्गावर चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून लगतच्या झाडाला कार आदळली.

Satara News : पुणे-बेंगळुरू महामार्गावर डीजेचा दणदणाट; खुन्नस देत तलवारी नाचवल्या; ३० जणांवर गुन्हा, ७ अटकेत

या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पाेलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *