Accident News : नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन कुटुंब मुंबईला निघालं, वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार- दुचाकीच्या अपघातात तिघांचा अंत

Accident News : नव वर्षाच्या सुरूवातीलाच जुन्रर तालुक्यात झालेल्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्यानं अख्ख्या कुटुबांवर अपघातानं घाला घातला आहे. या भीषण अपघातात अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला. हे कुटुंब सुट्टी संपवून मुंबईला आपल्या घरी निघाले होते. मात्र, वाटेतच मृत्यूनं गाठलं. या घटनेनंतर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नव वर्षाची सुरूवात अपघाताच्या सत्रानेच सुरू झाली आहे. जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर सीतेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला. कार आणि दुचाकीची धडक समोरासमोर बसल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai Local Accident : लोकलच्या दारात लटकून प्रवास, खांबाला धडकला अन् जीव गमावला, कामावरून जाताना २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नगर कल्याण महामार्गावर सीतेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि कारची धडक बसली. ही धडक इतकी जबर होती की, यात दुचाकीवरून प्रवास करणा-या एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. निलेश कुटे,जयश्री कुटे मुलगी श्रावणी कुटे असं मृत लोकांचे नाव आहे. हे कुटुंब नव वर्षानिमित्त मुंबईहून पिंपरी पेंढार येथे गावी सुट्टी आणि नव वर्ष साजरा करण्यासाठी गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब पिंपरी पेंढार या आपल्या गावावरून सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. कुटुंब दुचाकीवरून जात होती. दुचाकी कल्याणच्या दिशेने जात असताना, समोर आलेल्या कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जबर होती, निलेश आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर आदळले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नव वर्षाच्या सुरूवातीलाच अपघाताची घटना घडल्यानं जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पती पत्नीसह चिमुकल्या मुलीचा देखील अपघाती मृत्युमुळे दु:ख व्यक्त करण्यात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply