Accident News : कार आणि घोड्याचा भीषण अपघात; नवरदेवाला मिरवून परतताना वाटेतच मृत्यू

Accident News : नाशिकमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. कार आणि घोड्याचा अपघात होऊन घोडा जागीच मृत्यू पावलाय. सदर घटनेमुळे घोड्याचा मालक दु:खी आहे. घोड्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवालीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या त्र्यंबकनाका सिग्नल परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. मृत पावलेला घोडा एका लग्नावरून परतत होता. लग्नातील मिरवणुकीत त्याने नवरदेवाला छान नाचवलं. संपूर्ण मिरवणूक वाजत गाजत पार पडली. त्यानंतर घरी परतताना घोड्यावर काळाने घाला घातला.

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला झटका; 'जय भवानी' बाबतचा फेरविचार अर्ज फेटाळला

चंपा असं या घोड्याचं नाव आहे. कारने धडक दिली तेव्हा कारच्या फुटलेल्या कांचांमुळे घोड्याचा गळा चिरला गेला. त्याने तो गंभीर जखमी झाला. यातच त्याचा रस्त्यावर मृत्यू झाला. घोडा रस्त्यावरून जात असताना तो वेगात धावत होता. त्याच्यासमोरून एक कार जात होती.

धावत धावत घोडा थेट समोर असलेल्या कारवर धडकला. कारवर धडकल्याने कारच्या मागील बाजूची कार फोडून तो आत शिरला. यावेळी काच फुटून त्याच्या मानेला लागली. काचेमुळे त्याची मान कापली गेली. त्यामुळे घोडा जखमी झाला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घोड्याला आणि अपघातग्रस्त कारला तेथून बाजूला करण्यात आले. तसेच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातात कारमधील कुणालाही काही दुखापत झालेली नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply