Accident News : पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! भरतीच्या सरावासाठी जाताना भीषण अपघात; १ जागीच ठार, ३ जखमी

Accident News : सांगलीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पोलीस भरती सरावासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला झाला असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकल वरून पहाटेच्या सुमारास दोन दुचाकींवरुन चार तरुण भोसे मधून सांगली क्रीडा संकुल येथे येत होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबीजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनानेजोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Maratha Reservation : जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

शिरीष अमसिद्ध खंबाळे (वय 21, रा. भोसे) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्वजीत विजय मोहिते (वय 24, रा. भोसे) प्रथमेश उत्तम हराळे (वय 24, रा. भोसे), प्रज्वल साळुंखे (वय, 24 रा. कसबे डिग्रज) अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलिस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून प्रज्वल साळुंखे याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते. शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामध्ये ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply