Accident News : पुण्याहून अमरावतीला निघालेल्या कारचा समृद्धी महामार्गावर अपघात, युवक ठार

Accident News : समृद्धी महामार्गवर  कारने कंटेनरला मागून धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. हा अपघात वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील लोकेशन क्रमांक 234 वर झाल्याचे पाेलिसांनी नमूद केले. 

या अपघाताची पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपघातग्रस्त कार पुण्यावरून अमरावतीच्या दिशेने निघाली हाेती. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात चालत्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

Chhagan Bhujbal : 'सगेसोयरे' कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

या अपघातात शकील पठाण (वय 27) हा जागीच ठार झाला तसेच अनिकेत चंदू जाधव (वय 28) हा जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताचा लोकेशन 108 मालेगाव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यातील पायलट आणि वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी रुग्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply