Accident News : पैठण शेवगाव मार्गावर दुचाकींची जोरदार धडक; गाडीने जागेवरच घेतला पेट, १ ठार

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. आताही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शेवगाव मार्गावर आज दोन दुचाकींचा भीषण अपघात  झालाय. यामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झालाय. त्यानंतर दुचाकीने पेट घेतला आहे.

पैठणकडून शेवगावकडे जाणाऱ्या व शहराकडून पैठणकडे येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीने जागेवरच पेट घेतला होता. धडक झाल्यानंतर जागेवरच दुचाकीला आग लागली. 

Chhatrapati Sambhajinagar Crime News : वेश्याव्यवसाय प्रकरण; पुण्यातील डाॅक्टरसह महिलेस अटक

या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय. तर अन्य जखमी झालेल्या लोकांना पुढील उपचारासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

भंडारा जिल्ह्यात लाखोरी येथे देखील दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला होता. या घटनेत एकजण ठार तर ४ गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या. कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली होती.

'अति घाई, संकटात नेई' ही म्हण अलीकडे खरी होत आहे. दिवसेंदिवस वेगवान वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढलेले आहे. रोज अपघाताच्या नवीन घटना समोर येत आहेत. अनेकजण अशा अपघातांमध्ये आपला जीव देखील गमवत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply