Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडणार तोच... VIDEO व्हायरल

Accident On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर ११ डिसेंबर ते १९ जानेवारी म्हणजे ४० ते ४५ दिवसांत जवळपास २० अपघात झाले आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक दुसऱ्या दिवशी इथे अपघाताची घटना घडत आहे.

महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाल्याची बातमी सध्या समोर येत असून भरघाव वेगात असलेली कार कठडा तोडून खाली जाता जाता वाचली आहे. या धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर वाहन चालकांना वेग मर्यादादेखील देण्यात आलेली आहे. परंतु काही वाहन चालक वेग मर्यादेचं उल्लंघन करताना दिसत असून अपघातांच्या संख्येतदेखील प्रचंड वाढ झाली आहे. अशाच वाढत्या वेगामुळे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात भीषण अपघाताची घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कार चालक बाळासाहेब धरम हे एकटेच आपल्या कार क्र. एम एच १७ सीएम ४०७४ मधून औरंगाबादहून शिर्डीच्या दिशेने येत असताना सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव कार समृद्धी महामार्गावर असलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन धडकली. सुरक्षा कट्टा असल्याने कार मधोमध अडकून राहिली. रस्त्यावरुन २०-२५ फुट खोल पुलावर कार कडेला अडकल्याने मोठा अनर्थ टळला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply