Accident News : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दाेन मृत्यू, तीन जखमी

करकुंभ : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुंभ हद्दीत पुढे चाललेल्या मालट्रकला सोलापूरकडून भारधाव वेगात येणारी खाजगी आराम बस पाठीमागून धडकल्याने बसमधील गंभीर जखमी झालेल्या एक महिला व एक पुरूष प्रवाशाचा मृत्यू झाला. तर तीन प्रवाशी जखमी झाले असून सर्वजण सध्या पुणे शहराच्या परिसरात राहणारे आहेत. हा अपघात शनिवारी ( ता. ६ ) सकाळी झाला होता.

कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहत कार्यालय चौकात शनिवारी ( ता.६ ) सकाळी पुणे - सोलापूर महामार्गावरून पुण्याकडे जाणार्या मालट्रकला पाठीमागून भरधाव वेगात येणार्या खाजगी आरामबसने ( युपी.७८,एफएन.९२५७ ) धडक दिली. या अपघातात बसमधील शोभा गुरूनाथ कलबंडे ( वय ४५, रा.शाहु काँलनी,वेदांन्त नगरी,गल्ली नं ११, कर्वेनगर पुणे-५२ मूळ रा.बडधळ ता.अफजलपुर जि गुलबर्गा कर्नाटक ) व महादेव सोपान भिसे ( वय-४५,रा. रामनगर चिंचवड पुणे ) हे दोघे गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

तर राजश्री कल्याणराव मोरे ( वय-३९ सध्या रा. चिंचवडनगर पुणे. मूळ रा. उमरगा, जि उस्मानाबाद. ) आकाश दत्तात्रय पोकरकर ( वय २७, रा.कवठे यमाई ता.शिरूर जि पुणे. ), अनिल गुडाप्पा बडेगुर ( वय २५, रा.सुतारवाडी रोड,भवानीनगर,पाषाण पुणे ) व इतर काही जण किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात बसचे पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात गुरूनाथ चन्नाअप्पा कलबंडे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बसचालक सलीम महेबूब सडकवाला ( रा.कासार शिरसी, ता.निलंगा जि लातूर ) याने ताब्यातील बस निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून समोरील अज्ञात मालट्रकला धडक देऊन अपघात करून प्रवाशाच्या मृत्यू व जखमी होण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळे चालकाविरूध भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply