Accident : जालन्यात भीषण अपघात, माय-लेकीचा जागेवरच मृत्यू, ३ गंभीर

Jalna Road Accident: जालन्यात धुळे सोलापूर महामार्गावर वडीगोद्री जवळील सौंदलगाव फाट्यावर कारचा भीषण अपघात झालाय. वळणावर चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन उलटली अन् भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरवरून बीडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटली अन् रोडच्या खाली गेल्याने वाहनाचा अक्षरश चुराडा झाला. दरम्यान या अपघातातील जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हरवल्याची माहिती देखील समोर येत आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. एक वेगात असलेली कार अचानक पलटी झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अडीच वर्षांची नूरवी चव्हाण आणि २९ वर्षीय रोहिणी चव्हाण यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त सर्वजण छत्रपती संभाजीनगरमधील एन-४ भागातील रहिवासी आहेत. कार उलटल्याचे समजताच स्थानिकांनी धाव घेत तातडीने मदत केली.

अपघातामधील जखमींमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि एका बाळाचा समावेश आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पोलिसांनी प्राथमिक तपासात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अपघातात मायलेकीचा मृत्यू परिसरात हळहळ

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळच्या सुमारास वडीगोद्री जवळील सौंदलगाव फाटा परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. या अपघातात एका मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मायलेकीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे...

अपघातात तिघेजण गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक

आज सकाळी सोलापूर धुळे महामार्गावरील सौंदलगाव फाट्यावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहे. जखमींवर सध्या छत्रपती संभाजी नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.अमरदीप बाबूराव चव्हाण (वय ४० वर्षे),विश्रांती प्रदीप चव्हाण (वय २९ वर्षे),रुद्रांश प्रदीप चव्हाण (वय २ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत..

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply