Accident : सोलापूरहून घराकडे निघाले, काळाचा घाला, ३ जणांचा मृत्यू, २ गंभीर

 

Solapur Accident News : सोलापूर-विजयापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजतेय. या भीषण अपघतामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. (Solapur-Vijayapura highway accident: Three dead, two injured after car crashes into a tree)

विजयपूर - सोलापूर महामार्गावर अपघात झाला. यामध्ये तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहे. सोलापूरहून विजयपूरकडे जातं असताना कन्नळ क्रॉसजवळ अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला जाऊन अदाळल्याने अपघात झाला. विजयकुमार रेवणसिद्धप्पा, अभिषेक सावंत आणि राजू बिरादर अशी मृतांची नावे आहेत. जखमीवर विजयपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा पुढील तपास विजयपूर ग्रामीण पोलीस करत आहेत.

Gangapur Crime Case : मुलाचा मृतदेह शासनाने पोहोचवावा; अंत्ययात्रा न काढता अंत्यसंस्कार करा; खंडपीठाचा आदेश

विजयपूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 50 वर कन्नाल क्रॉस येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झालाय. हे तिन्ही तरूण विजयपूर येथील राहणारे आहेत. सोलापूरहून कारमधून पाच जणांचा ताफा घराकडे परत निघाला होता. त्यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. विजयकुमार रेवणसिद्धप्पा, अभिषेक सावंत आणि राजू बिराद अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची नोंद करणाऱ्या विजयपुरा ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, दोन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply