Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकलेंच्या अडचणीत वाढ; ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी

Abhijeet Bichukale  : नेहमी चर्चेत असलेल्या अभिजीत बिचुकलेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. लहुजी छावा संघटनेने अभिजीत बिचुकले यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अभिजीत बिचुकले यांनी कोण लहुजी? म्हणून उल्लेख केला होता. बिचुकले यांच्या या वक्तव्याने महार आणि मांग यांच्यात जातीय तेढ निर्माण होईल असं या संघटनेचा आरोप आहे त्यामुळे बिचुकले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अभिजीत बिचुकलेंना जीवे मारण्याची धमकी

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा, अशा धमक्या येत असल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. अभिजीत बिचुकले यांनी याबाबत थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.

पत्रात बिचुकले यांनी म्हटलं की, मी कसबा निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर मला विरोधकांकडून अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच मला पुणे सोडून जाण्यास सांगितलं जात आहे. तुम्ही पुणे सोडून न गेल्यास तुमचा खून करु अशी धमकी दिली जात आहे, असं बिचुकलेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

धमक्या येत असलेले फोन नंबर देखील बिचुकले यांनी पत्रात दिले आहेत. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण मिळावं, तसेच मला धमकी देणाऱ्यांना तत्काळ अटक करावी अशा मागणी त्यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply