Abdul Sattar : नुकसान पाहणीला मंत्री अब्दुल सत्तारांकडून उशीर; ५ तासांपासून शेतकरी ताटकळले, अधिकारीही उपाशीपोटी

Abdul Sattar : सकाळी ८ वाजेपासून  सत्तार  यांचा नुकसान पाहणी दौरा सुरू होणार होता. मात्र १२ वाजूनही ते हिंगोलीत दाखल न झाल्याने तब्बल ५ तासांपासून शेतकरी उपाशीपोटी ताटकळत बसले आहेत. त्यांच्यासोबत अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर ठाम मांडून आहेत.

एकीकडे नुकसानग्रस्त पाहणी भागाचा दौरा करण्याचं ढोंग करायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना ताटकळत बसवायचं, सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का? असा सवाल उपस्थित करीत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Manoj Jarange Patil : छगन भुजबळांपाठोपाठ नारायण राणेही जरांगेंच्या रडारवर? 'त्या' टीकेला एका वाक्यातच उत्तर

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. खरीप हंगामातील पिकांसह रब्बी पिकेही मातीत गेली आहेत. त्यामुळे नुकसाग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने अहवाल सादर करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसह प्रशाकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशातच हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर येणार होते.

खरं तर अब्दुल सत्तार यांचा हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा अधिकृतरित्या गुरुवारी रात्री उशीरा प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त झाला होता. मंत्रीमहोदय भल्यापहाटेच दुष्काळ पाहणी दौऱ्यावर येणार असल्याने अधिकाऱ्यांनीही घाईगरबडीत कामे आटोपत शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली.

सकाळी ७ वाजेपासूनच जिल्ह्यातील हिवारा गावातले शेतकरी आणि प्रशासकीय अधिकारी मंत्री सत्तार यांच्या आगमनाची वाट पाहत बसले होते. मात्र, १२ वाजूनही सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर न पोहचल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply