Aarey Colony Ganpati Visarjan : आरे कॉलनीतील ६ हजार विघ्नहर्त्याच्या विसर्जनावर येणार विघ्न? प्रशासनाच्या निर्णयाला रवींद्र वायकरांचा विरोध

Aarey Colony Ganpati Visarjan : गणेशोस्तव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात सर्वत्र बाप्पाच्या आवडीच्या वस्तू, पदार्थ आणि सुंदर मुर्ती पाहायला मिळत आहेत. पर्यावरणाची हानी होऊनये यासाठी बरेचजण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात. अशात मुंबईच्या आरे कॉलनीत गणपती विसर्जनाला यावर्षी विघ्न येणार का? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील घरगुती आणि सार्वजनिक असे एकूण सहा हजार गणपती विसर्जनाला असतात. यावर्षी त्यांच्यावर विघ्न येणार का? असा प्रश्न आरे प्रशासनाच्या निर्णयामुळे उपस्थित झाला आहे. इको सेन्सिटिव्हच्या नावाखाली आरे तलावात गणपती विसर्जन करण्यास यावर्षी आरे प्रशासनाने बंदी आणली आहे.

Nana Patole: 'काहीतरी वेगळं शिजतंय' ; 'इंडिया VS भारत' वादादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य

आरे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात स्थानिक आमदार रवींद्र वायकर आक्रमक झाले आहेत. आरे प्रशासन आणि महापालिकेने जर आरे तलावात विसर्जन करण्यास विरोध केला तर आरेतील जनतेच्या जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागणार असा इशाराच वायकर यांनी आरे प्रशासनाला दिला आहे.

"हिंदूचे सरकार म्हणता मग हिंदूच्या गणपती विसर्जनाला बंदी का आणता? नेहमी हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवता आता तुम्ही झोपलेत का? शेजारी राहणाऱ्या भाजपा आमदाराच्या कानावर हा विषय गेला नाही का?", असे प्रश्न रवींद्र वायकरांनी सरकारला विचारले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply