Aamshya Padvi Joins Shinde Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; आमदार आमश्या पाडवींचा शिंदे गटात प्रवेश

Aamshya Padvi  : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तय्यत तयारी केली आहे. भाजपने नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसला ही जागा सुटणार आहे. या जागेसाठी ठाकरे गटाचे आमश्या पाडवी देखील इच्छुक होते. या राजकीय घडामोडीनंतर आमदार आमश्या पाडवी यांनी आज रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

नंदुरबार लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सुटणार असल्याचे बोलले जात आहे. या जागेसाठी आमश्या पाडवी इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट मिळालं नाही. नंदुरबार लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Mumbai : IIT, IIM मध्ये रात्रीचा दिवस करुन शिकला; मात्र, नोकरीला लागताच काही महिन्यांतच संपवलं जीवन

आज रविवारी दुपारी आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून पाडवी यांची ओळख आहे.

आमदार आमश्या पाडवी म्हणाले, 'आम्ही सर्व एकाच पक्षात असताना माझी निवड झाली. मला दोन वेळा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. मग माझी परिषदेत माझी निवड झाली. मी नंदुरबारचं प्रतिनिधित्व करतो. त्याचा अद्याप विकास झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विकासावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे'.

'आज मला ज्यांनी आमदार केलं, त्यांच्यासोबत जायला हवं म्हणून मी आज प्रवेश केला. काँग्रेससोबत आजपर्यंत दोन हात करत आलो. त्यांनाच आता पाठिंबा देत प्रचार कसा करणार? माझे लोक म्हणायचे आपल्या नंदुरबारचा विकास व्हायल हवा. म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला. मी शिवसनेत काम करत असताना दादा भुसेंनी कायम मार्गदर्शन केले. मी विश्वास ठेवून आलोय. आमच्या नंदुरबारचा विकास आणि कुपोषण हा घालवण्यात आम्हाला मदत करावी, असे ते पुढे म्हणाले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply