श्रीनगर : लडाखनंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना; प्रवाशांनी भरलेली बस उलटली

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये आज (शनिवार) सकाळी मोठी दुर्घटना घडलीय. जम्मूहून डोडा जिल्ह्यात येणारी बस शुक्रवारी उधमपूरच्या बत्तल बालियान भागात उलटली. बसमधील 25 प्रवासी जखमी झाले असून जखमींना उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयातदाखल करण्यात आलंय, तर इतर सहा गंभीर जखमी प्रवाशांना जम्मूतील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. हा अपघात कशामुळं झाला हे अद्याप समजू शकलेलं नाहीय. सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. ड्रायव्हरला झोपेमुळं बस कंट्रोल करता आली नसावी, त्यामुळं हा अपघात झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, 7 जवान शहीद

लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्करातील 7 जवान शहीद झाले आहेत. अपघातावेळी वाहनात एकूण 26 जवान होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच गंभीर जखमी जवानांना भारतीय हवाई दलाच्या मदतीनं उच्च केंद्रात पाठवण्यात आलंय. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ज्यात अधिक गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीनं वेस्टर्न कमांडमध्ये समाविष्ट केलंय. परतापूर येथील शिबिरातून 26 जवान उपसेक्टर हनीफकडे जात असताना ही घटना घडली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास थोईसेपासून सुमारे 25 किमी अंतरावर वाहन अचानक रस्त्यावरून घसरले आणि सुमारे 50-60 फूट खोलीवर असलेल्या श्योक नदीत कोसळल्याचं वृत्त आहे. या अपघातात गाडीतील सर्व जण जखमी झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply