बरेली (उत्तर प्रदेश) : रुग्णवाहिका चालकाच्या डुलकीने घेताला ७ जणांचा जीव

बरेली (उत्तर प्रदेश) : नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी ज्या रुग्णवाहिकेचा वापर केला जातो, मात्र, त्याच रुग्णवाहिकेतुन प्रवास करणाऱ्या ७ जणांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णवाहिकेतुन प्रवास करणाऱ्या सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली परिसरात ही दुर्घटना घडली असून रुग्णवाहिका चालविणाऱ्या ड्रायव्हरला झोप अनावर झाल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली-लखनौ राष्ट्रीय महामार्गावर दिल्लीहून एक रुग्णवाहिका येत होती. या रुग्णवाहिकेत बसलेले ७ जण पीलीभित येथील रहिवासी होते. ते दिल्लीतून तपासणी करून राममूर्ती रुग्णालयाची रुगणवाहिकेतून परत येत होते.

ते परतत असतानाच रुग्णालयाची रुगणवाहिका चालविणाऱ्या ड्रायव्हरला झोप अनावर झाल्याने त्याची डुलकी लागल्याने ड्रायव्हरचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला आणि रुग्णवाहिकेने बरेलीहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला जोरीची धडक दिली. या धडकेत रुग्णवाहिकेत असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ३ महिला आणि ३ पुरूषांचा समावेशी आहे. सदरची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घटना घडली असून, राममूर्ती रुग्णालयाची ही रुग्णवाहिका होती.

या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटव्दारे दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघाताबद्दल मला खूप दु:ख वाटतंय. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, असं ट्विट त्यांन केलं आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले. तर या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगितलं की, रुग्णावाहिका घटनास्थळावरून बाजूला काढण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून दरम्यान,या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेलेल्यांच्या कुटुंबीयांची ओळख पटवण्यात आली आहे. मृतांमध्ये ६ जण पिलीभीतचे रहिवासी आहेत तर रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply