Pune : महिलांची छेड काढाल तर भर चौकात मारू, पुणे पोलिसांचा भाईंना सज्जड दम

Pune Crime News Update : गेल्या काही दिवसांपासून गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत. ज्या ठिकाणी गुन्हा केला, त्याच ठिकाणी गुंडांची वरात, धिंड काढण्याचा पॅटर्न पुणे पोलिसांनी राबवलाय. तरीही काही गुंडांना फरक पडत नाही. त्यांना आता पुणे पोलिसांनी सज्जड दम दिलाय. महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा सज्जड दम पोलिसांनी दिलाय. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

पुण्यातील स्वयंघोषित "भाईंना" पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. त्या दोन जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर वरात काढली.

Pune Metro : अरे वा! पुणे मेट्रोतर्फे प्रवाशांना ई- बाईकची सुविधा, १० मेट्रो स्थानकांवर मिळेल बाईकची सेवा

ज्या भागात त्यांनी दहशत माजवली, त्या भागात त्यांची मिरवणूक काढून पोलिसांनी दम भरला. या गुन्ह्यातील आरोपींकडून धारदार हत्यार व गावठी कट्टा जप्त करण्यात आले आहे. धिंड काढताना पोलिसांनी आरोपींना सज्जड दम देत इतर गुन्हेगारांनाही इशारा दिलाय. महिलांची छेडछाड, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा इशारा पुणे पोलिसांनी सज्जड दम दिलाय. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणवीर आहे. यातच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पुण्यातील होणे गरजेचे भाष्य करताना पोलिसांना सूचना दिल्या आहेत. कुठलाही गुन्हेगाराला पाठीशी घालू नका, त्यांची धिंड काढा. त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून खाकीची ताकद काय असते याची अनुभूती गुन्हेगारांना पहायला मिळतेय. पुण्यातील येरवडा, कोंढवा अनेक परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलीस ॲक्शन मध्ये गेल्याचे पाहायला मिळतंय. कोयते फिरवणे, महिलांची छेडछाड करणे, रोड रोमिओ अशा अनेक गुन्हेगारांवर जरब ठेवण्यासाठी आता धिंड पॅटर्न पाहायला मिळतोय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply