Ind vs Aus Weather Update : मोठी अपडेट! भारत-ऑस्ट्रेलिया सामना होणार रद्द... मग कोणाला होणार फायदा? जाणून घ्या समीकरण

India vs Australia T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता ग्रोस आयलेट येथील डॅरेन सेंमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला, त्यामुळे त्याच्यावर टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत कांगारू संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना हा सामना कोणत्याही किमतीवर जिंकावाच लागेल.

पण याआधीच चाहत्यासाठी एक वाईट बातमी येत आहे. हवामान खात्यानुसार, आज ग्रॉस आयलेटमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
सेंट लुसियामध्ये कसे असेल हवामान?

वन विभागापुढे लांडग्यांच्या संवर्धनाचे आव्हान; मूळ प्रजाती नष्ट होण्याची चिन्हे

दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रॉस आयलेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला आणि रात्री उशिराही पाऊस पडला आहे. हा सामना सेंट लुसिया वेळेनुसार सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळला जाणार आहे, परंतु सकाळी पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 च्या सुमारास पावसाची 51 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत बराच वेळ पाऊस पडल्यास सामना रद्द करावा लागू शकतो. असे झाले तर कोणत्या संघाचे जास्त नुकसान होईल आणि कोणत्या संघाला फायदा होईल, चला जाणून घेऊया....
सामना रद्द झाल्यास फायदा कोणाला?

सुपर-8 सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत पाऊस किंवा अन्य कारणामुळे सामना रद्द करावा झाला. तर दोन्ही संघामध्ये प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपल्या गट-1 मध्ये 5 गुणांसह अव्वल स्थानावर असेल आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करेल.

पण एका गुणाने ऑस्ट्रेलिया अडचणीत येणार आहे. त्याचे एकूण गुण 3 होतील. अशा स्थितीत त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकल्यास 4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर जाईल. या सामन्यात बांगलादेश संघाने अफगाणिस्तानला हरवले T तर दोघेही बाहेर होतील. त्या स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ ३ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल, त्या स्थितीत अफगाण संघ 2 गुणांसह बाहेर होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply