Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत," नाना पटोलेंच्या आरोपावर ठाकरे काय म्हणाले?

लोकसभा निवडणुक पार पडल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पहिल्यांदा बैठक घेतली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी-एससीपी आणि शिवसेना (यूबीटी) चे प्रमुख नेते सहभागी झाले होते..

दरम्यान बैठकीनंतर महाविकास आघाडीची परत्रकार परिषद झाली. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याना, पत्रकारांनी विचारले की, महाविकास आघाडीत नाराजी आहे का कारण नाना पटोले म्हणतात की उद्धव ठाकरे माझा फोन उचलत नाहीत.

पत्रकारांच्या या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देत, तो विषय आता संपला आहे," असे म्हटले. ते पुढे म्हाणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात तो मुद्दा होता. त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघात आम्ही आणि राष्ट्र‌वादीने काँग्रेसला पाठींबा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडीला 30 जागी विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. याचबरोबर त्यानी युट्युब, सोशल मीडिया आणि विविध सघटनानी संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर मांडला त्याबद्दल त्याचेही आभार मानले.

Sharad Pawar : पंतप्रधानांनी विधानसभेसाठी अजून सभा घ्याव्यात... शरद पवारांनी का मानले मोदींचे आभार ?

ठाकरे भाजपबरोबर जाणार का?

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे याना विचारण्यात आले की, तुम्ही भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल, यावर ठाकरे यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे हात करत, हे बरोबर असताना तुम्हाला खरे सागू असे म्हटले, त्यावेळी तेथे एकच हशा पिकला.
काय आहे पटोले-ठाकरे प्रकरण?

राज्यात चार जागांवर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केले, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. यासंदर्भात ठाकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनही उचलला नाही, असेही पटोले म्हणाले होते.

निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर व्यतिरिक्त नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर विभागाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत 30 जागा जिंकल्या.

यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा, शिवसेने उद्ध ठाकरे आणि भाजपने प्रत्येकी 9 जागा, राष्ट्रवादी शरद पवार यांनी 8 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे यांनी 7 जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अवधी एक जागा जिंकली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply