Maratha Reservation : "लोकसभा निकालात जरांगेंचा इम्पॅक्ट नाही", ओबीसींसाठी उपोषणाला बसलेल्या हाकेंचा हल्लाबोल

 

Laxman Hake on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण मागे घेतलं. मात्र जालन्यातच आंदोलनाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे.
आंतरवाली सराटी येथे सहा दिवस उपसोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे.

३० जूनपर्यंत सरकारला वेळ देवून सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीचा शब्द त्यांनी सरकारकडून घेतला.
दुसरीकडे जालन्यातल्या वडीगोद्री येथे ओबीसींच्या हक्कांसाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन पुकारलं आहे. शुक्रवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंच्या इफेक्ट आजिबात दिसला नाही, असं म्हणत जरांगना संविधानाबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Politcs : नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत! सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड

लक्ष्मण हाके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात जरारीच्या इफेक्ट चालला, असं म्हणता येणार नाही, तसं असत तर मंगेश साबळेना दीड लाख मतं पडली नसती साबळेंना मतदान करु नका, असंआवाहन जरांगनी केलं होतं, असंही हाके म्हणाले,
हाके पुढे म्हणाले की, मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणुकीचं श्रेय घेऊ नये. जरांगे हे तत्त्वज्ञानी नाहीत,

विचारवंत नाहीत की सोशल वर्कर नाहीत, त्यांचं कुठेच योगदान नाही. या सुमार माणसाला संविधानाबद्दल अभ्यास नाही, त्यांच आंदोलन हे राजकीय भावनेने होतं, असंही हाके म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply