Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल; केंद्रात मंत्रिपद मिळणार का? राष्ट्रवादीची खेळी नेमकी काय ?

NCP Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना केंद्रमध्ये मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं होतं. पराभवामुळे खचून गेलेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं आणि केंद्रीय योजनांचा थेट फायदा मतदारसंघासाठी व्हावा, यासाठी सुनेत्रा पवार यांच नाव पुढे आल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

Dombivali MIDC : डोंबिवली एमआयडीसीतील ४१ कंपन्यांना नोटीस; ८ कंपन्या कराव्या लागणार बंद, अग्नितांडवानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्व्हे

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळेल, असं सांगितलं जातंय, मोदी सरकराच्या नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्र‌वादी काँग्रेसला मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. मात्र आता सुनेत्रा पवारांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते.
सुनेत्रा पवार विजयी होण्याइतपत संख्याबळ असल्यानेच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. बारामतीला शरद पवार, सुप्रिया सुळे व आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तीन खासदार मिळतील. बारामती लोकसभा मतदारसंघाचा या निमित्ताने केंद्रीय निधीतून मोठा विकास होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply