Monsoon hits Kerala : पाऊस आला रे! २ दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Monsoon hits Kerala  : यंदा उन्हाने कहर केला. उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. आता या मान्सुनच्या संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवमान खात्याने या सं

उन्हाळ्याने त्रस्त झालेल्यांसाठी आणि शेतीची मशागत करुन आता वरुणराजाची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. आज भारतीय हवामान खात्याने मान्सून संदर्भात सर्वात महत्वाची अपडेट दिली असून केरळमध्ये मान्सून धडकल्याची घोषणा केली आहे. १ जूनही मान्सूनच्या आगमनाची तारीख असते, मात्र यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

ICC T20 Team Ranking : टी-20 वर्ल्ड कपआधीICCची मोठी घोषणा! क्रमवारीत भारतीय संघ पहिल्यास्थानावर कायम

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस ५ जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये १० जूनपर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, वेळेच्या आधीच मान्सूनची एन्ट्री झाल्याने बळीराजासह उकाड्याने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दर्भात महत्वाची घोषणा केली आहे.

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच बंगालच्या उपसागरात मान्सून मजबुत स्थितीत आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून लवकर बरसेल, असाही अंदाज हवामान खात्याने सांगितला होता. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता कोकणात पाऊस बरसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply