RCB Troll : बंगळुरूला जमणार नाही... CSKच्या स्टार खेळाडूने रेल्वेचा फोटो टाकून RCBला का केलं ट्रोल?

Tushar Deshpande trolls RCB : पुन्हा एकदा आरसीबीचे स्वप्न भंगले... 22 मे 2024 रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. ज्यामध्ये संजू सॅमसनच्या संघाने फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचा पराभव केला. आरसीबीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर सीएसकेचा खेळाडू तुषार देशपांडे याने काहीतरी पोस्ट केले आहे जे चर्चेत आले आहे.

18 मे 2024 चा दिवस कोण विसरू शकेल जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून प्लेऑफसाठी पात्र ठरले. अशा परिस्थितीत आता काल आरसीबीही आरआरकडून हरल्यानंतर आयपीएलमधून बाहेर पडल्याने चेन्नईचे चाहते सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करत आहेत.

तुषार देशपांडे RCB ला ट्रोल?

तुषार देशपांडेच्या इन्स्टा स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आरसीबीच्या पराभवानंतर टिंगलटवाळी करताना दिसत आहे. हा फोटो सीएसके फॅन्स आर्मीने त्यांच्या X हँडलवर शेअर केला आहे. तुषारने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक रेल्वे स्टेशन दिसत आहे ज्यावर बेंगळुरू कँटचा बोर्ड दिसत आहे.

Virat Kohli: कोहलीला संघात न घेण्यासाठी भारतात कारणे का शोधतात? विराटसाठी दिग्गज खेळाडूची ‘बॅटिंग’

जरी याचा अर्थ बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशन असा होतो, परंतु इंग्रजी भाषेत पाहिले तर याचा अर्थ 'बंगळुरूला जमणार नाही' असा देखील होतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवानंतर हा फोटो पोस्ट करण्याचा एकच अर्थ आहे की, सीएसकेचे चाहते थेट विराट कोहलीच्या आरसीबीला टार्गिट करत आहेत, जे आजपर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेले नाहीत. पण आता ही पोस्ट तुषारच्या सोशल मीडिया हँडलवर दिसत नाही. याशिवाय, असेही बोलले जात आहे की कदाचित त्याने स्वतः ते डिलीट केले असेल.

आयपीएलमधील आरसीबीचा यंदाचा प्रवास खूपच रोमांचक राहिला आहे. सलग सहा सामने गमावल्यानंतर त्याने शानदार पुनरागमन केले आणि सलग सहा सामने जिंकले. त्यानंतर सीएसकेचा पराभव करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला आणि यावेळीही त्यांना ट्रॉफी गमवावी लागली. केकेआर आधीच फायनलमध्ये पोहोचला आहे आणि त्याचा सामना हैदराबाद किंवा राजस्थान यापैकी एकाशी होईल.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply