RCB vs CSK : पावसामुळे सामना रद्द कोणाचा खेळ होणार खल्लास? चेन्नई-बंगळूरमध्ये प्ले-ऑफसाठी झुंज, जाणून घ्या गणित

Rain Update For RCB vs CSK IPL 2024 : कोलकता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले असून आता चौथ्या स्थानासाठी चेन्नई सुपरकिंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन संघांमध्ये कमालीची चुरस लागली आहे.

चेन्नई-बंगळूर यांच्यामध्ये आज बंगळूरतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलमधील महत्त्वाची लढत पार पडणार आहे. या लढतीच्या निकालावर प्ले ऑफमधील चौथा संघही निश्‍चित होणार आहे; पण पावसाचा व्यत्यय या लढतीत अडथळा ठरण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास यजमान संघ बंगळूरचे आव्हान संपुष्टात येईल आणि चेन्नई प्ले ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरेल.

गुजरात-कोलकता व गुजरात-हैदराबाद या दोन लढती पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे गुजरातकडे प्ले ऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी थोडीशीही संधी मिळाली नाही. पावसाच्या व्यत्ययाचा फायदा हैदराबादला झाला. गुजरातविरुद्धची लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली आणि एक गुणासह हैदराबादचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला.

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंम

आता चेन्नई-बंगळूर यांच्यामधील लढतीवरही पावसाचे सावट आहे. पावसाचा व्यत्यय चेन्नईसाठी हितकारक ठरेल, तर बंगळूरसाठी हानीकारक ठरणार आहे. बंगळूरमध्ये पाऊस थांबला, की १५ ते २० मिनिटांत लढत सुरू होऊ शकते. तेथील संघटनेकडून उत्तम व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून रात्री आठ ते अकरा या वेळेमध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे लढत पूर्ण होईल की नाही, याबाबत सांशकता आहे.

आकडेवारी चेन्नईच्या बाजूने

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वात महत्त्वाची लढत उद्या होणार आहे. चेन्नई-बंगळूरमध्ये होत असलेल्या या लढतीवर जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या लढतींच्या निकषावर नजर टाकल्यास चेन्नईचे पारडे जड दिसून येत आहे. दोन संघांमध्ये ३२ लढती झालेल्या आहेत. चेन्नईने २१ लढतींमध्ये विजय मिळवून वर्चस्व गाजवले आहे. बंगळूरला दहा सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे. दोन संघांमधील एका लढतीचा निकाल लागलेला नाही.

विराट कोहलीच सर्व काही

बंगळूरच्या संघाने मागील पाच लढतींमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखले आहे. या संघाची मदार विराट कोहलीच्या फलंदाजीवर आहे. त्याने १३ सामन्यांमधून एक शतक व पाच अर्धशतकांसह ६६१ धावा फटकावल्या आहेत. फाफ ड्युप्लेसी, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, विल जॅक्स व कॅमेरून ग्रीन यांनी त्याला उत्तम साथ दिल्यास बंगळूरला मोठ्या विजयाची आशा करता येणार आहे. गोलंदाजीत अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नसली, तरी मागील काही लढतींमध्ये बंगळूर संघातील गोलंदाजांनी कात टाकली आहे. यश दयाल, मोहम्मद सिराज, ग्रीन, लॉकी फर्ग्युसन व स्वप्नील सिंग यांना चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे.

 
धोनी, ॠतुराज धावून येणार

मथिशा पथिराना, मुस्तफिजूर रहमान, दीपक चहर हे प्रमुख गोलंदाज चेन्नईच्या संघात नाहीत. त्यामुळे गोलंदाजी विभाग कमकुवत झाला आहे; तरीही तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, माहीश तीक्षणा, रवींद्र जडेजा यांनी मागील लढती प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे या गोलंदाजांवर चेन्नई संघ अवलंबून राहू शकतो. मात्र कर्णधार ॠतुराज गायकवाड (५८३ धावा) याची फलंदाजी व महेंद्रसिंग धोनीचा अनुभव या दोन महत्त्वाच्या बाबी चेन्नईसाठी धावून आल्यास त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश पक्का होईल. डॅरेल मिचेल, शिवम दुबे यांच्यासह अजिंक्य रहाणे, जडेजा यांनीही फलंदाजीत ठसा उमटवायला हवा.

 

अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी समीकरण

- कोलकता, राजस्थान, हैदराबाद हे तीन संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले असून चौथ्या स्थानासाठी चेन्नई (१४ गुण) - बंगळूर (१२ गुण) यांच्यामध्ये रस्सीखेच लागली आहे.

- बंगळूरला आजच्या लढतीत चेन्नईवर विजय मिळवणे आवश्‍यक आहे.

- बंगळूरला चेन्नईवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. प्रथम फलंदाजी केल्यानंतर १८ धावांनी विजय मिळवणे गरजेचे असणार आहे. धावांचा पाठलाग करताना ११ चेंडू राखून विजय मिळवावा लागणार आहे.

- चेन्नईने या लढतीत साधा विजय मिळवला तरी त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येणार आहे. तसेच पावसाच्या व्यत्ययामुळे लढत होऊ शकली नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा वेळी चेन्नईचा संघ १५ गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहोचणार आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply