Vishal Patil : मी आजही काॅंग्रेसचा एकनिष्ठ, सही करणा-यांनी त्यांचा विचार करावा; विशाल पाटील संभाव्य कारवाईवर स्पष्टच बाेलले

 

Vishal Patil : मी कुठलाही नियम तोडला नाही. लेखी आदेश मला आला नाही. वसंतदादा घराणे मध्ये काँग्रेस आहे. माझ्यावर कारवाई करायची आहे तर सही करणा-यांनी विचार करावा. आमच्या घराण्याने जे योगदान काँग्रेस पक्षासाठी  दिले आहे ते पाहावे आणि कारवाई करावी असे मत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केले. गुरुवारी सांगली येथे काॅंग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याचा अहवाल काॅंग्रेस श्रेष्ठींकडे पाठविला जाणार असल्याचे पाटील यांना विचारला असता त्यांनी माध्यमांशी बाेलताना मी आजही पक्षाचा एकनिष्ठ असल्याचे सांगितले.

पाटील पुढे बाेलताना म्हणाले कालच्या कार्यक्रमाला काय झाले माहीत नाही. कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. पण त्यांच्या भावना आहेत. त्या उमटल्या असतील आणि घोषणाबाजी झाली असेल. विश्वजित कदम यांनी पहिल्या पासून उमेदवारी मागितली होती. हा अन्याय  काँग्रेस  पक्षावर झाला. पण दुर्देव आहे. पुढच्या काळात विश्वजित कदम आमचे नेते असतील असेही विशाल पाटील यांनी नमूद केले.

Varsha Gaikwad : मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीचा तिढा सुटला; वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

सांगलीच्या तीन दुष्काळी तालुकच्या दौरा केला. पाण्यासाठी गावकरी कर्नाटक मध्ये जात आहेत. भाजपवर नाराजी लोकांची आहे. गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संजय पाटील यांच्यावर लोकांचा रोष आहे असेही विशाल पाटील यांनी नमूद केले. संजय पाटील हे भाजपकडून उभे आहेत. म्हणून त्यांना मत पडतात. कोणाचे डिपॉजिट जप्त होईल असे मी म्हणणार नाही असे एका प्रश्नावर त्यांनी नमूद केले. 

यंदाचा निकाल काकांची झाेप उडवेल

संजय पाटील यांनी आरोप केला की विशाल पाटील यांच्या भावाला पराभूत केले, विशाल यांना दुसऱ्यांदा पराभव करू. यावर विशाल पाटील याने उत्तर दिले. काकांनी चांगले स्वप्न बघावे पण निकाल वेळी त्याची झोप उडेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply