Pune lok Sabha : मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार

Pune lok Sabha :  देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरु आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून बारकाईने लक्ष आहे. अशातच काँग्रेसने पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून 'राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात' या मथळ्याखाली जाहिरात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली. या प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली.

Pune Crime News : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी गोळीबार; तरुणावर तीन गोळ्या झाडल्या; येरवडा परिसरात खळबळ

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी आणि काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी यांनी या तक्रारीबद्दल सांगितलं. 'राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला, याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असा काँग्रेसने केला आहे.

त्यानंतर काँग्रेसचे पुरंदरे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply