Rohit Pawar and Crab : 'त्या' खेकड्याचं नेमकं काय केलं? रोहित पवारांनी स्पष्टीकरण देताना भाजपला धरलं धारेवर

Rohit Pawar and Crab : राज्य सरकारच्या कारभाराविरोधात माहिती देताना आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत प्रतिकात्मकरित्या जिवंत खेकडा घेऊन आले होते. पण यावरुन भाजपनं त्यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. यावरुन आता रोहित पवारांनी भाजपला धारेवर धरत त्या खेकड्याचं नेमकं काय केलं? हे देखील सांगितलं आहे.

रोहित पवारांनी ट्विट केलं की, भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत मी खेकडा दाखवल्यामुळं भाजप चांगलंच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय. यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन घडवलं आहे. 

Follow us -

Maharashtra Lok Sabha : उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिंदे गटाला उमेदवार मिळेना; महागुरुंसह दोन बड्या कलाकारांचा निवडणुकीस नकार

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता आणि नंतर तो नदीत सोडून दिला त्यामुळं खरंतर त्याचा जीव वाचला. पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड सुरू झाली आहे. याचं कायदेशीर उत्तर मी देईलच पण तुम्ही काय म्हणणार अशा या बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना? असा सवालही त्यांनी केला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply