Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडी कायमची मिटणार? महापालिकेच्या अर्थसंकल्पात १४०० कोटी रुपयांची तरतूद

Pune News : पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. विविध उपाययोजन करून देखील वाहतूक कोंडी दिवसंदिवस वाढतच चालली आहे. अशात आता पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. त्यावेळी त्यात ही तरतूद करण्यात आली.

यामार्फत पुढील वर्षभरात विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले व अर्धवट असलेल्या ३३ रस्‍त्यांचे भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल, समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधणे यासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात काल सादर करण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मदत होणार आहे.

Entertainment News : Maidaan Trailer भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ केला जिवंत, अजय देवगणच्या 'मैदान'चा रोमांचक ट्रेलर रिलीज

सिमला ऑफिस ते आनंद ऋषिजी चौक, कात्रज कोंढवा गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर चौक २४ मीटर रस्ता, वारजे शिवणे नदीकाठचा रस्ता अशा अनेक रस्त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव करण्यात आला आहे.

मिळालेल्या निधितून रस्त्यांचे डांबरीकरण करणे यासाठी ६८९ कोटी रुपयांची तरतूद आहे. रस्ते विकसित करणे यासाठी १०५ कोटी रुपये. रस्ते पुन्हा डांबरीकरण करणे १५५ कोटी आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे यासाठी १४ कोटी अशी इतर कामे केली जाणार आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply