Raju Patil : जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे, सरकारने कोणाच्या जीवाशी खेळू नये... मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला फटकारले!

Raju Patil :  मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना सरकार दरबारी मात्र त्यांच्या मागण्यांबाबत शांतता पाहायला मिळत आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राजू पाटील?

"मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीवरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. 'मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे, अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चुक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये," असे ट्वीट आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

RajyaSabha Election 2024 : काँग्रेसकडून राज्यातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, चार नावे जाहीर

आज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली.

आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांना बोलताही येत नाहीये. डॉक्टरांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply