Raj Thackeray : 'कायदे आहेत, पण ऑर्डर नाहीत, मुंबई पोलिसांना ४८ तास द्या...' गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंच ट्वीट

Raj Thackeray : दहिसरमध्ये काल रात्री शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवकअभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भयंकर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचा आरोप केला जात आहे'

आपल्या देशात कायदे आहेत. लॉ आहेत पण ऑर्डर्स नाहीत. माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. १०० टक्के विश्वास आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात ४८ तास द्या, त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करुन द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. फक्त ऑर्डर्स नसतात. पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जर जेलमध्ये जावं लागतं असेल, का जातील ते जेलमध्ये?"

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसवर गुन्हा दाखल; 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

"वर बसलेला माणूस टेंपररी आहे. त्याच्यासाठी परमनंट जेलमध्ये जायचं, ह्याला काय अर्थ आहे का? आपल्याकडे उत्तम कार्य करणारे पोलीस अधिकारी आहेत. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. त्यांना फक्त ४८ तास मोकळा हात द्या,"

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply