Sharmila Thackeray : मनसेकडून पुणे लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार? शर्मिला ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य

Sharmila Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून देखील जबरदस्त तयारी सुरु आहे. मनसेनेही लोकसभेची रणनिती तयार केली आहे. मनसेकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 

मनसे पुणे लोकसभेसाठी मोर्चाबांधणी करत आहे. राज ठाकरेंचे पुणे दौरे अलीकडे वाढले आहेत. लोकसभेसाठी मनसेकडून साईनाथ बाबर आणि वसंत मोरे या दोन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली होती. याबाबत शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी उमेदवाराबाबत स्पष्टच संकेत दिले आहेत.

Accident News : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात, ३ ते ४ वाहने एकमेकांवर आदळली

शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, मार्च- एप्रिलला लोकसभा निवडणूका होतील. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. पुढच्या वर्षी महापालिका होतील. मनसेनं पुण्यात चांगलं काम केलं आहे. आपला पक्ष सतत काम करतो. कोवीड काळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते. तेव्हा आपले मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते, अशी जोरदार टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत

मनसेचा पुण्यातील उमदेवार कोण असणार यावर बोलताना त्या म्हणाल्या की, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचं नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, असं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply