Nandurbar News : महिलांची हंडाभर पाण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट; नर्मदा काठावरील तिनसमाळ गावातील वास्तव

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नर्मदा काठावरील तीनसमाळ गावात तीव्र पाणी टंचाई जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे परिसरातील तीनसमाळ गावातील महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. घाट रस्त्यातून महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे वास्तव पाहण्यास मिळत आहे.

Mann Ki Baat : 'देव ते देश, राम ते राष्ट्र', PM मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी साधला संवाद

नंदुरबार जिल्ह्यातील या अतिदुर्गम भागात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात  सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या भागात पाण्याचे स्त्रोत नसल्याने झऱ्याच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. त्या ठिकाणीही पाणी कमी असल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसभर बसून रहावे लागत असल्याची स्थिती आहे. प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply