Loksabha Election 2024 : शरद पवार फुंकणार लोकसभेचे रणशिंग; शिर्डीत राष्ट्रवादीचे २ दिवसीय शिबीर

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक जशजशा जवळ येतील तसतसे राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आव्हान देत असतानाच आता शरद पवार गटानेही लोकसभेचे रणशिंग फुंकायला सुरूवात केली आहे. उद्यापासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभा निवडणूकांसंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाचे शिबीर...

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्यापासून (३, जानेवारी) शिर्डीत  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पालखी निवारा परिसरात होणाऱ्या या शिबिराची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे  अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Pune Crime News : पुण्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 1 कोटींचा दारुसाठा जप्त; दोघांना अटक

लोकसभेचे रणशिंग फुंकणार!

'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' हे ब्रीद वाक्य घेऊन शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकवटणार आहेत. मागील वर्षीही याच ठिकाणी राष्ट्रवादीचे शिबिर झाले होते. यावेळी मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर या शिबिराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या शिबिरातून शरद पवार गट फुंकणार आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.

आमदार प्राजक्त तनपुरेंची टीका...

दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या शिबिराची माहिती देताना अजित पवार गटावर निशाणा साधला. "सत्ता नसतानाही शरद पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांचे हे शिबिर आहे. सर्वांना पवार साहेबांच्या विचारांची ऊर्जा मिळणार असून देशात आणि राज्यात विरोधी पक्षांना चिरडण्याचे धोरण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप..

"आम्ही लाखों लोकांचे प्रतिनिधित्व करतो. मात्र निधी वाटपात दूजाभाव केला जातोय. ही लोकशाहीची हत्या केल्या सारखं आहे. दबाव टाकून विरोधी पक्षांची लोकं फोडली जात आहेत... असे गंभीर आरोप त्यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply