Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत पहाटे स्फोट; ३ कामगार जखमी, परिसरातही बसले हादरे

Bhandara News :  सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास स्फोट  झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. तर या दुर्घटनेत ७- ८ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर  प्राथमिक उपचार करण्यात आले. 

भंडाऱ्यातील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये ही घटना झाली आहे. घटनेचे मूळ कारण अजून गुलदस्त्यात असून हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजले गेले आहेत. काही कामगारांना किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात टेक्निसीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर जमाणे व कंत्राटी कामगार हटवार हे जखमी झाले. त्यांना नागपूरयेथे हलवण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. 

Jitendra Awhad : ट्रक चालकांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा, राक्षसी कायद्याला विरोध: जितेंद्र आव्हाड

परिसरातही बसले हादरे 

स्टील कंपनीत झालेला स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेला परिसर देखील हादरले होते. पहाटेच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये घाबरत पसरली होती. या दुर्घटनेत कंपनीतील सामानाचे देखील मोठे नुकसान झाले असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply