Nagpur Accident: हृदयद्रावक! डंपरच्या धडकेत बहिण- भावाचा मृत्यू; नागपुरातील घटना

Nagpur Accident : नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपुरच्या बिडगाव परिसरात भरधाव ट्रकने भाऊ बहिणीला धडक दिली. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (२९, डिसेंबर) सकाळी नागपूरमधील  बिडगाव परिसरात कचरा घेऊन डंपरने बहिण भावाला चिरडल्याची घटना घडली. शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

Nitish Kumar News : 'जेडीयू'मध्ये मोठी उलथापालथ, लल्लन सिंह यांचा राजीनामा; नितीश कुमार पक्षाचे नवे अध्यक्ष

सुमित सैनी (वय, १८) अंजली (वय, १६) अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघाताची  माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यावेळी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट डंपरला आग लावली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अंजली ही एका कॅफेत काम करत होती तर भाऊ सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता. भीषण अपघातात बहिण- भाऊ दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply