Chandrashekhar Bawankule : बारामतीसह राज्यात 45 पेक्षा जास्त जागा भाजप मिळवेल; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Chandrashekhar Bawankule : मी ज्या लोकांशी बोललो आहे त्या सगळ्या लोकांनी पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच झाले पाहिजेत असे सांगितले आहे. कुठला तरी "सी" वोटरच्या सर्वेला मी मनात नाही. मात्र नांदेड बारामतीसह राज्यात 45 पेक्षा जास्त जागा भाजप मिळवेल हे मी दाव्याने सांगतो, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय. 

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केलीये. अशात या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याची शक्यता वर्तवणारा "सी" वोटर सर्वे नुकताच पार पडला. या सर्वेवरून काँग्रेस नेते  अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली होती.

Earthquake News : जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; भल्यापहाटे लोकांची पळापळ

सर्वेनुसार भाजपच्या अनेक जागा डळमळीत आहेत. असे असताना देखील बावनकुळे जनतेशी खोटं बोलत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. या आरोपावर बोलत असताना 45 पेक्षा जास्त जागा भाजप मिळवेल असा दावा बावनकुळेंनी केलाय.

जिथं जिथं भाजपचे खासदार आहेत त्या त्या जागांवर भाजपच्या उमेदवाराला जागा मिळाल्या पाहिजेत. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाची सुद्धा मागणी असणार आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर मतांचं विभाजन टाळण्यास मदत होईल असं अशोक चव्हाण म्हणाले होते.

यावर बावनकुळे यांनी जर तरची लढाई काँग्रेसने बऱ्याचवेळा लढली आहे. त्याला काही अर्थ नाही, जनता काय म्हणते ते महत्वाचं आहे असं म्हटलंय. शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत या अजित पवार आणि भुजबळ यांच्या मागणीवर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिलीये. रस्त्यावर कितीही मागणी केली, तरी राज्यातील महायुतीतील तीन नेते आणि भाजपाचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जे ठरेल तेच ऑथेंटिक जागा वाटप असेल असं बावनकुळे म्हणाले आहेत



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply