Jeffrey Epstein Files : अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्स सार्वजनिक केल्यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या फाईल्समध्ये जगातील अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध लोकांची नावे आलेली आहेत. जेफ्री एपस्टीन हा बाल लैंगिक गुन्ह्यांतील गुन्हेगार आहे. तुरुंगात असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. समोर आलेल्या एपस्टीन फाईल्समध्ये तो लहान मुलींना कशा पद्धतीने फसवायचा, त्यांचे शोषण कसे करायचा? याबाबतची धक्कादायक माहिती समोर आलेला आहे. यासह या एपस्टीन फाईल्समध्ये आतापर्यंत अब्जाधीश बिल गेट्स, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सन अशा दिग्गजांची नावे आलेली आहेत. असे असतानाच आता याच एपस्टीन फाईल्समधून जगाला हदरवून टाकणारी धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याने जगप्रसिद्ध अशा नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये या शास्त्रज्ञाच्या बाजूला तीन तरुण मुली दिसत असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमके प्रकरण काय? तो शास्त्रज्ञ नेमका कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार या वैज्ञानिकाचे नाव जेम्स वॉटसन असे आहे. ते एपस्टीन याच्या न्यूयॉर्क येथील महालात उपस्थित असल्याचे एका फोटोमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या आजूबाजूला एकूण तीन तरुणी दिसत असून फोटोमध्ये वॉटसन स्मीतहास्य करत असल्याचे दिसत आहे. हाच फोटो पाहून सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. जेम्स वॉटसन हे काही सर्वसामान्य शास्त्रज्ञ नाहीत. जीवशास्त्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी डीएनच्या डबल हेलिक्स संरचनेचा शोध लावलेला आहे. त्यांनी लावलेला हा शोध जगातील ऐतिहासिक असा आहे. त्यांच्या शोधनानंतर जीवशास्त्रात मोठी क्रांती घडून आली.
Nobel Prize-winning scientist DNA scientist James Watson pictured with women in Epstein’s house pic.twitter.com/KbrrbvWvDe
— Ounka (@OunkaOnX) February 17, 2026
जेम्स वॉटसन यांच्याविषयी एपस्टीन फाईल्समध्ये नेमकं काय आहे?
जेम्स वॉटसन यांनी 1953 साली हा डीएनए संदर्भातला शोध लावला होता. त्यानंतर 1962 साली त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेम्स वॉटसन यांचा 2025 साली वयाच्या 97 व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आता एपस्टीन फाईल्समध्ये त्यांचे नाव आणि फोटो असल्याचे समोर आले आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे भविष्यात आणखी कोणकोणती माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


