Pune Water Supply : पुणेकरांना दिलासा!गुरूवारी शहराला नियमित पाणीपुरवठा होणार, पाणी बंदचा निर्णय मागे

पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे पर्वती उपकेंद्र येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते. त्यामूळे पुणे महापालिकेने गुरुवारी ( ता. १०) पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपींग व वडगाव जलकेंद्र यांच्या अंतर्गत येणार्या भागात पाणी बंद असेल असे जाहीर केले होते.

मात्र गुरवारचे पाणी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापारेषण द्वारे गुरुवारी विद्युत पुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचे काम केले जाणार होते. त्यामुळे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांना देखील केला जाणारा विद्युत पुरवठा बंद राहणार होता. त्यामुळे महापालिकेने काही भाग वगळता संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Pune Dam : भामा आसखेड धरणात ८२ टक्के पाणीसाठा; धरण परिसरात येताना पर्यटकांनी काळजी घ्यावी

मात्र या संदर्भात काही नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ही आयुक्तांची चर्चा करून पाणी बंद ठेवण्याचा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापारेषण ने देखील वीजपुरवठा बंद ठेवणार नसल्याचे सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply