Kirit Somaiya : किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात मोठी अपडेट! 'तो' व्हायरल व्हिडिओ खरा; गुन्हे शाखेतील सूत्रांची माहिती

Kirit Somaiya Video : काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली असून तो व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनेने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही चांगलेच गाजले होते.याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे.

व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचं आढळलं आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.

Kalyan : रस्त्यावर उभ्या जेसीबीला टेम्पोची धडक; टेम्पो चालक जखमी, कल्याण मधील घटना

ठाकरे गटाने केले होते गंभीर आरोप...

दरम्यान,शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप लावले होते. तसेच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply