Kirit Somaiya : 'किरीट सोमय्या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल द्या' महिला आयोगाचं पोलिस आयुक्तांना पत्र

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हीडिओचं प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणावरुन विरोधकांनी घमासान केलं.

सोमय्यांच्या कथित व्हीडिओप्रकरणी आता राज्य महिला आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं असून या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल द्यावा, असं सांगण्यात आलेलं आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (दोन) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्वीकारणे आधी त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेण्याकरीता प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

Kirit Somaiya : अंबादास दानवेंनी सभापतींना दिला ८ तासांच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह, सोमय्यांनी महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप

पत्रात पुढे म्हटले आहे की, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हीडिओ माध्यमातून प्रसारित होत आहे. सदर बाबत विविध सामाजिक संस्थांकडून महाराष्ट्र राज्य महिला आयोगात विचारणा होत आहे. तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करुन आपण केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा.

असं पत्र आज मंगळवारी रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवलेलं असून पोलिस काय तपास करतात आणि अहवाल कधी पाठवतात, हे बघावं लागेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply