Maharashtra Politics : मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये पदाची अदलाबदल होणार? मुख्यमंत्री 3 दिवस सुट्टीवर असल्याची चर्चा

Maharashtra Political Crisis : राज्याचं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. येत्या काही दिवसांत राज्यात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांदरम्यानच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदांची अदलाबदल करावी अशी भाजपची इच्छा असल्याचे बातमी समोर येत येत आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्ट्रो यांनी एक ट्वीट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. क्लाईड क्रास्ट्रो यांनी एक ट्वीट करून म्हटले की, "हे पण खरं आहे का???श्री. @mieknathshinde (एकनाथ शिंदे) यांनी कामावरून तीन दिवसांची सुट्टी घेतल्याची बातमी आहे. मीडियातील सूत्रांचे म्हणणे आहे की, त्यांनी नाराज होऊन सुट्टी घेतली आहे. कारण @BJP4India (भाजप) ची इच्छा आहे की त्यांनी श्री. @Dev_Fadnavis (देवेंद्र फडणवीस) यांच्यासोबत सरकारमध्ये आपल्या पदाची अदलाबदल करावी."

मुख्यमंत्र्यांनी 3 दिवसांची सुट्टी घेतल्याची चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी 3 दिवसांची सुट्टी घेतल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदाची अदलाबदल होणार म्हणून नाराज मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतली का? असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान राज्याच्या राजकारणात एकीकडे या उलट सुलट चर्चा सुरु असताना भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते कर्नाटकात आहेत. तेथील निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे कर्नाटकमध्ये गेले आहेत

पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय हे नक्की

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. पडद्यामागे काहीतरी खूप मोठं घडत असून ते पूर्णपणे लपून राहिलेलं नाही. अधूनमधून कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या तोंडून त्याचा उल्लेख होत असतो. आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाणार हे नक्की असल्याचा दावा आजच्या सामना या मुखपत्रातून केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आगामी निवडणूकांसंदर्भात मोठं विधान केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply