Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धीवर अपघात सत्र सुरूच; टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Amravati Accident News: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका संपता संपत नाही आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे . अमरावती जिल्ह्यातील शिवनी फाट्याजवळ कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकताच अमरावती जिल्ह्यातील शिवनी फाट्याजवळ कारचा टायर फुटल्याने भीषणअपघात झाल्याची घटना घडली आहे. नागपूरकडून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहे.

अपघातातील दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीचे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस सध्या करत आहेत. समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे अपघात रोखण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे. समृद्धी महामार्गावर अनफीट टायर असलेल्या वाहनांचे तपासणी सुरू आहेत.

काल काही केलेल्या वाहन तपासणीत कारचे टायर पूर्णपणे वोर्न आऊट झालेले आढळून आले आहेत. त्या कारणामुळे सदर वाहनांना समृद्धीवरून परत पाठवण्यात येत आहेत. वाढत्या अपघातामुळे अनफीट टायर असलेल्या वाहनांना समृध्दी महामार्गावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याचदरम्यान, अमरावती जिल्ह्यातील शिवनी फाट्याजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरकडे येताना भीषण अपघात

काही दिवसांपूर्वी देखील समृद्धी महा मार्गावर अपघात झाला होता. शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना हा भीषण अपघात (Accident) झाला होता.

या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला होता. या जखमीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply