PMPML Bus : शेवाळेवाडी ते आळंदी बस सुरू!

मांजरी : पीएमपीएलच्या शेवाळेवाडी आगाराकडून शेवाळेवाडी ते आळंदी अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी फुलांनी सजविलेल्या पहिल्या दोन बस टाळमृदंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा नामघोष करीत आळंदीकडे रवाना झाल्या. माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे, रामदादा शेवाळे, पांडुरंग शेवाळे, आगार व्यवस्थापक सुरेन्द्र दांगट यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.

शांताराम शेवाळे, वसंत शेवाळे, सुनील शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, दीपक शेवाळे, संजय कोद्रे, विजय कोद्रे, संभाजी हाके, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, वैशाली हरपळे, रसिका कुंभारकर, दिगंबर शेवाळे, कैलाश जैस्वाल, राम खेडेकर, रमेश कोद्रे, विजय शेवाळे, जयप्रकाश शहा, पीएमपीएलचे शिवाजी चंद आदी यावेळी उपस्थित होते.

माजी उपसरपंच राहुल शेवाळे म्हणाले, "शेजारी आगार असूनही आळंदी किंवा त्या मार्गावर जाण्यासाठी सोलापूर रस्त्यावरील भाविक व इतर नागरिकांना हडपसर गाडीतळ येथे जावे लागत होते. शेवाळेवाडी येथून आळंदीकडे जाण्यासाठी बस असावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानुसार बस सुरू झाली आहे. आता देहू मार्गावरही येथून बस मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. या दोन्हीही बसमुळे भाविकांची चांगली सोय होईल.'

"वरिष्ठांच्या आदेशानुसार शेवाळेवाडी आगारातून आळंदीसाठी बस सुरू करण्यात आली आहे. सध्या या बसच्या सकाळी दोन व दुपारी दोन फेऱ्या असणार आहेत. प्रवासाचे अंतर छत्तीस किलोमीटर असून त्यासाठी पंचेचाळीस रूपये इतका तिकीट दर आहे.'

सुरेन्द्र दांगट, शेवाळेवाडी आगार व्यवस्थापक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply