15 YRS Of 26/11 Mumbai Attack : फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती मुंबई; ३ दिवस सुरु होता मृत्यूतांडव

15 YRS Of 26/11 Mumbai Attack  : कधी न थांबणारं शहर अशी ओळख असलेली मुंबई आजच्याच दिवशी फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती. आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईचा वेग अचानक थांबला होता. तीन दिवस शहरात अक्षरश: मृत्यूतांडव सुरु होता.

समुद्रमार्गे 10 दहशतवादी मुंबईत पोहोचले होते आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर अनेक ठिकाणी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांशी तीन दिवस चाललेल्या चकमकीनंतर अजमल आमीर कसाब नावाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते.

China New Virus : चीनमध्ये पसरतोय नवीन व्हायरस, WHOनेही दिला इशारा; काय आहेत लक्षणे, भारतासाठी किती धोकादायक?

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा समावेश देशातीलच नाही तर जगभरातील मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये होतो. सर्व 10 दहशतवादी पाकिस्तानातील कराची येथून बोटीने मुंबईत आले होते. भारतीय नौदलाला फसवण्यासाठी त्यांनी एका भारतीय नौकेचे अपहरण केले आणि त्यातील सर्व लोकांना ठार केले. या बोटीतून ते रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मासळी मार्केटमध्ये उतरले आणि त्यानंतर ते मुंबईच्या विविध भागात गेले.

या ठिकाणांना दहशतवाद्यांनी केले होते लक्ष्य

त्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना लक्ष्य केले. मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊस यांना लक्ष्य करण्यात आले. याशिवाय रात्री 9.30 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे स्थानकावर 4 दहशतवाद्यांनी AK-47 ने लोकांवर गोळीबार सुरू केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले होते, मात्र तोपर्यंत विलेपार्लेमध्येही गोळीबार सुरू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याने तीन दिवस मुंबईत मोठा रक्तपात केला होता.

एनएसजी कमांडोंनी मुंबईला दहशतवाद्यांपासून केलं मुक्त

मुंबईला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी पोलीस आणि लष्कराने कारवाई सुरू केली होती. तीन दिवस चाललेल्या या कारवाईत लष्कर आणि पोलिसांच्या तुकड्यांसोबत एनएसजी कमांडोचाही सहभाग होता. तीन दिवस चाललेल्या चकमकीत सर्व दहशतवादी मारले गेले आणि एक अजमल आमिर कसाब जिवंत पकडला गेला. कसाबला 2012 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. थरकाप उडवणाऱ्या या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. मुंबईकर आजही ते तीन दिवस विसरलेले नाहीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply