12th HSC RESULT : 'आज सगळे सोबत, पण कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत', निकालानंतर संतोष देशमुखांची मुलगी रडली

 

12th HSC RESULT : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी बारावी पास झाली आहे. वैभवी देशमुखला बारावीला ८५.३३ टक्के गुण मिळाले. वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीने चिकाटीने बारावीची परीक्षा दिली आणि तिला चांगले यश मिळाले. बारावीचा निकाल लागल्यानंतर संतोष देशमुखांची मुलगी खूपच भावुक झाली. निकालानंतर कौतुकाची थाप द्यायला आज माझे वडील नाहीत अशी खंत व्यक्त करत वैभवी देशमुख रडली. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीच शिक्षा द्या अशी मागणी तिने यावेळी केली.

वैभवी देशमुखने सांगितले की, 'मला ८५.३३ टक्के मार्क्स मिळाले आहेत. पण आज मला खरंच ऐवढे मार्क्स मिळाले याचा मला काहीच आनंद वाटत नाही. कारण आमचा आनंद यांनी हिरावून घेतला. माझ्या वडिलांना न्याय मिळावा ऐवढीच अपेक्षा आहे. ऐवढ्या मार्क्सची अपेक्षा नव्हती. पण महाराष्ट्राच्या साथीने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या पाठीशी आहे म्हणून आज हे सर्व मार्क्स त्यांच्यामुळेच आहेत.'

वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीने परीक्षेची तयार करून परीक्षा दिली. त्याबद्दल तिने सांगितले की,'तो काळ खूपच कठीण होता. आज आम्ही विचार देखील करू शकत नाही. ते दु:खाचे डोंगर याआधी आम्ही कधीच अनुभवले नाही आणि आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण कुणाचीही मानसिकता नव्हती तरी देखील सर्वांना वाटते की मी माझ्या करिअरमुळे परीक्षा द्यावी. म्हणू मी परीक्षा दिली. सर्वांच्या साथीने आणि वडिलांच्या आशीर्वादाने निकाल चांगला लागला.'

12th HSC Result : संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले

वडिलांची काय इच्छा होती याबद्दल वैभवी म्हणाली की, 'दहावीनंतर माझी नीटची तयारी सुरू होती तर त्यांना वाटत होते की ही नीटची तयारी करते तर हिने स्वत:च्या पायावर उभं राहावं. ती जे करते त्यात तिला यश मिळावे असे माझ्या वडिलांना वाटत होते. काल मी दिलेला नीटचा पेपर खूप अवघड गेला. माझे स्कोरिंग १५०च्या खाली आहे. पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.पण आज या गोष्टीची खंत वाटते की माझ्या या यशात माझे वडील माझ्यासोबत नाही. त्यांच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवर नाही आहे.'

तसंच, 'माझ्या वडिलांची हत्या निर्घृण झाली. त्याचे दु:ख आम्हाला खूप होते ते कायम राहिल. आम्ही स्वप्नातही त्या दु:खाचा विचार केला नाही. आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडणार नाही. ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आणि गावापासून हिरावून घेतले त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि आरोपींना फाशीवर लटकवा.', अशी मागणी वैभवी देशमुखने केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply