12th HSC Result : संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले

 

12th HSC Result : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीचा बारावीचा निकाल समोर आला आहे. वैभवी देशमुख हिला बारावीला ८५. ३३ टक्के मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. वैभवी देशमुख हिचं देखील हे बारावीचं वर्ष होतं. तिने बारावीला ८५. ३३ टक्के मिळवून यश संपादन केलंय.

दिवंगत संतोष देशमुख यांचं निर्घृण हत्या करण्यात आली होती. कुटुंबावर दुखा:चं डोंगर होता. तरी देखील मागे न हटता, या परिस्थितीतून जात वैभवीने चिकाटीने अभ्यास करून अव्वस गुण मिळवले.

 


निकाल लागल्यानंतर वैभवी देशमुख हिने साम टीव्हीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली, 'आज मिळालेले गुण आनंद देणारे असले तरी, वडिलांच्या अनुपस्थितीने तो आनंद अधूरा आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या साथीने हे यश मिळवता आलं. दुखा: च्या अशा डोंगरांना आम्ही कधीच सामोरे गेलो नव्हतो. पण आता त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे', अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली.

HSC Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर! कोकणने परंपरा राखली तर लातूर तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?

 


'आज ते सोबत नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि शिकवणी माझ्यासोबत आहे', असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. निकाल लागताच मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी वैभवीला कौतुकाची थाप दिली. यावेळी देशमुख कुटुंबातील लोकांचे डोळे डबडबले होते.

दुखा:चा डोंगर तरीही अव्वल गुणांनी पास

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ साली निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. याच वर्षी संतोष देशमुख यांची लेक बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करत होती. देशमुख कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असला तरी, न डगमगता तिने ८५.३३ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply